पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत महायुतीने शेकाप महाविकास आघाडीचा पराभव केला. मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या सहा, तर एक अपक्ष जागा बिनविरोध झाली होती. त्यानंतर गुरुवारी 71 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत 53 जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन महायुतीने एकूण 59 जागा जिंकल्या. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर यशस्वी ठरले आहेत.