शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आयुष्मान आरोग्य मंदिर तिगाव (प्राथमिक आरोग्य केंद्र, तिगाव) येथे 'अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान' उत्साहात राबविण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये सिकलसेल या गंभीर आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार असून, त्याची वेळीच तपासणी आणि निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत जनजागृती करण्यात आली