महागाव: तालुक्यातील बोरी इजारा शेतशिवारात बिबट्याचे दर्शन; शेतकरी भयभीत, वन विभाग घटनास्थळी दाखल
महागाव तालुक्यातील बोरी इजारा शेतशिवारात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मधुकर राठोड व पितू राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात मोठमोठ्या डरकाळ्या ऐकल्या, तर आज कापूस वेचणीस गेलेल्या मजुरांच्या दृष्टीस प्रत्यक्ष बिबट्या पडल्याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान शेतकरी नेते मनीष जाधव यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांना तात्काळ सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.