गंगाखेड: खळीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांना रहदारीस अडथळा
जायकवाडी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीला होत असून या पाण्यामुळे नदी, नाले ओसांडुन वाहत आहेत. याचा परिणाम ग्रामीण भागातील छोटे छोटे वाहतूक करणाऱ्या पुलावर झाला आहे. खळीच्या शेजारी पुलावर बॅक वॉटरचे पाणी आल्याने रहदारी करणारा पुल पाण्याखाली गेला. आज बुधवार 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सकाळी ध्वजारोहण करण्यासाठी शाळेकडे जात असताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.