जितेंद्र यांनी घेतले गणपती बाप्पाचे दर्शन! पुण्याच्या ट्रॅफिकवर म्हणाले, ‘तीन तास लागले असते...’
पुण्यातील प्रसिद्ध राजाराम मंडळाला ज्येष्ठ हिंदी अभिनेते जितेंद्र यांनी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा अनुभव सांगितला.
दर्शनासाठी जाताना रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होती. कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे आपण नियोजित वेळेत पोहोचू शकलो, अन्यथा या प्रवासासाठी तब्बल तीन तास लागले असते, असे जितेंद्र यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी बालपणीच्या आठवणीही जागवल्या. पूर्वी चाळीत सुमारे १०० कुटुंबे एकत्र राहत आणि एकमेकांशी आपुलकीने वागत असत; मात्र आज शेजारी कोण राहते, हेही अनेकांना माहीत नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गणपती बाप्पाकडे मनःशांतीसाठी प्रार्थना केल्याचेही जितेंद्र यांनी सांगितले.
#Jeetendra #JeetendraSir #PuneGanpati #RajaramMandal #GanpatiBappa #Ganeshotsav #PuneNews #PuneTraffic #GanpatiDarshan #Bollywood #MaharashtraNews
Pune City, Pune | Sep 24, 2026