चिखलदरा: कडाव फाट्याजवळ रस्त्यावर कोसळले विशालकाय झाड;वाहतूक तासभर ठप्प,वाहनचालकांची गैरसोय
चिखलदरा-धारणी-परतवाडा या प्रमुख मार्गावरील कडाव फाट्याजवळ आज सकाळी सुमारे १० वाजता एक विशालकाय झाड अचानक रस्त्यावर कोसळले. या घटनेमुळे काही काळ दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी वाहनांची मोठी रांग लागली आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सुदैवाने झाड कोसळताना कोणतीही जीवितहानी अथवा वाहनांचे नुकसान झालेले नाही.मात्र,झाड इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पसरल्यामुळे तातडीने वाहतूक कोंडी निर्माण झाली