भंडारा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असतानाही, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पत्नी अश्विनी भोंडेकर यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीत पराभव झाला असला तरी, मागासवर्गीय असतानाही खुल्या प्रवर्गाच्या जागेवर १३,१०३ मतदारांनी दाखवलेला विश्वास कौतुकास्पद असल्याचे आमदार भोंडेकर म्हणाले. "जनतेने दिलेला कौल आम्हाला शिरसावंद्य असून, प्रतिकूल परिस्थितीत