नवी मुंबईच्या सीवूड्स सेक्टर क्रमांक 42 येथील संगम गोल्ड्स नावाच्या सोन्याच्या दुकानांमध्ये भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. दुचाकी वरून भुरका घालून आलेले अज्ञात आरोपी दुकानात शिरले आणि थेट दुकान मालकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचे दुकान लुटले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. मात्र भर दिवसा झालेल्या दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.