समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिवस साजरा: २६/११ आतंकवादी हल्ल्यात शहीद जवानांना अर्पण केली श्रद्धांजली
समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन व मुंबई येथे २६/११ आतंकवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, ग्रामसेवक अखिल ढोबळे,पोलिस पाटील मेघाताई धोटे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली