समुद्रपूर: खुर्सापार जंगलात जाऊन वाघ पाहण्याचा मोह जिवावर बीतू शकतो:खबरदारी द्या:वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे
समुद्रपूर तालुक्यातील खुर्सापार जंगल परिसरात एक वाघ एक वाघीण व तिच्या तिन पिल्याच्यां अशा ५ वाघांचा वावर असुन रोज खुर्सापार जंगलात नागरीक मोठ्या प्रमाणात जाऊन दिवसा व रात्री वाघ पाहण्याच्या हौशीपोटी वांघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो व्हिडिओ काढत आहेत.कोणीही जवळ जाऊन व्हिडिओ फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये अशा कृत्यामुळे केव्हा मनुष्यावर हल्ला होण्याची दाट शक्यता आहे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांनी नागरीकांना केले आहे.