नागपूर शहर: 'वचनपूर्ती २०१७-२०२६': भाजपने मांडला नागपूरच्या विकासाचा लेखाजोखा
२०१७ मध्ये नागपूरकरांना दिलेली आश्वासने आम्ही केवळ हवेत न सोडता ती जमिनीवर उतरवून दाखवली आहेत, असा विश्वास भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला आहे. 'वचनपूर्ती २०१७-२०२६' या अहवालाद्वारे गेल्या नऊ वर्षांतील विविध विकासकामांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागपूरला खऱ्या अर्थाने 'स्मार्ट' आणि 'सुविधासंपन्न' केल्याचा दावा पक्षाने केला आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी क्रांती झाल्याचे अहवालात म्हटले आहे.