मोहोळ: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना सगळी मदत दिली जाईल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Mohol, Solapur | Sep 27, 2025 सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज या नुकसानीची पाहणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. दरम्यान यावेळी ते आज शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मोहोळ तालुक्यातील नांदगाव येथे सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बोलत होते. यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना सगळी मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सर्व ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.