पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी मिशन निर्भया अंतर्गत अवैध मसाज सेंटर, स्पा सेंटर व लॉजवर कारवाई करणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, अंमलदार व पथक यांना आदेशित केले होते. दि 4 डिसेंबर 2025 रोजी वरिष्ठांना गोपनीय माहिती मिळाली की, तामसा टी पॉईंट ते तामसाकडे जाणारे रोडवर नई आबादी व वाजपेयी नगर येथे काही इसम महिलांकडून बळजबरीने वैशाव्यवसाय करवून घेत आहेत. त्यावरून उपरोक्त कारवाई करण्यात आली आहे.