जत: जत येथील सराईत गुन्हेगार सांगली जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार
Jat, Sangli | Aug 29, 2025 आगामी सण-उत्सव निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सागर अशोक पाथरुट (वय २८, रा. विठ्ठलनगर, जत) याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी ही कारवाई केली. सागर पाथरुट याच्यावर खुनाचा प्रयत्न, गर्दी, मारामारी, गंभीर दुखापत, धमकी देणे, शिवीगाळ करणे, नुकसान करणे, अशा स्वरूपाचे तीन गंभीर आणि पाच अदख