नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात येईल तसेच या प्रशासकीय इमारतीमुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवा-सुविधा उपलब्ध होणार असून प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख होणार आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. नागरी सेवा व सुविधा योजनेअंतर्गत तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तळा येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.