सेनगाव: संपर्क कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न,जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले मार्गदर्शन
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क कार्यालयात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. येत्या काही महिन्यांमध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजणार असून त्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या उपतालुकाप्रमुख व सर्कल प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.