वडवणी: वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकला सोन्याच्या दागिने सह रोख रक्कम 18 लाखाचा ऐवज लंपास
Wadwani, Beed | Oct 28, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी घरावर धाडसी दरोडा टाकत तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते.सुमारे आठ दरोडेखोरांनी गावातील एका घरामध्ये प्रवेश करून घरातील सर्व नागरिकांना चाकूचा धाक दाखवून एका खोलीत कोंडले. त्यानंतर घरातील महिलांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. तसेच घरातील तीन लाख रुपये रोख रक्कम आणि पंधरा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने