धामणगाव रेल्वे: हिरपूर येथे वीज कोसळून चार महिला जखमी ;दोन गंभीर तर दोन किरकोळ जखमी; जखमी महिलांवर यवतमाळ येथे उपचार सुरू
हिरपूर तालुका धामणगाव रेल्वे येथील चवरे यांच्या शेतामध्ये आज दुपारी वीज कोसळून चार महिला गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली.या दुर्घटनेत पिंकी प्रमोद बनसोड 40 व मीना नामदेव आत्राम वय 35 यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर धामणगाव रेल्वे शासकीय रुग्णालयातून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. तर शारदा प्रवीण कुडमते वय 30 व सौ. नंदा दिलीप ठाकरे वय 30 या किरकोळ जखमी असून, उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.जखमीं वर यवतमाळ येथे उपचार सुर आहे