अवैध सावकारीविरोधात 7 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने राबविलेल्या धाडसत्रात जप्त ताबेगहाण मालमत्तांबाबत संबंधितांनी दावे दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केले. मनोहर कृपलानी, दिनेश कृपलानी व संतोष अहिर यांच्याकडे तारण ठेवलेली मालमत्ता असल्यास कर्जदार किंवा वारसांनी 29 डिसेंबर 2025 रोजी पाहणी करून 30 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत आवश्यक पुराव्यासह दावे सादर करावेत.