फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी सामूहिक कट करून हा हत्याकांड झालेला आहे असा आरोप ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी केला असून ,याला मी हत्याकांड म्हणतो, ही आत्महत्या नाहीये, त्या ठिकाणी राज्याचे प्रमुख हे आरोपीला क्लीन चिट देत आहेत, तर यावरून कुठेतरी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने 3 नोव्हेंबर रोजी फलटण येथे मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी आज सायंकाळी 7 वाजता सांगितले