कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावात वन्यप्राणी तरसाच्या हल्ल्यात रेडी मृत्युमुखी,भीतीचे वातावरण
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे तरसाच्या हल्ल्यात एक रेडी मृत्युमुखी पडलेली असून, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात एक जनावर मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुची या गावातील पशुपालक शेतकरी सुखदेव बापू जाधव यांच्या शेतातील गोठ्यात वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याने एक रेडी मृत्युमुखी पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली असता, वनपरिक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडे कर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी एल कोळी (दंडोबा) वनरक्षक अमीर काकतीकर (हरोली) वनसेवक विठ्ठ