समुद्रपूर: ग्रामपंचायत मोहगांव तावी, जि.प.शाळेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध कार्यक्रमाचे आयोजन
मोहगांव ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने तसेच तावी येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र व कामगार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश मांडवकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे,पोलिस पाटील मेघाताई धोटे, ग्रामपंचायत सदस्य प्रणालीताई वांढरे, सुनिताताई वाघाडे,मुख्याध्यापक रमेश वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.