समुद्रपूर: गिरड येथे गावात रामधुन काढून साजरी करण्यात आली राष्ट्रासंत तुकडोजी महाराजांची ११६ वी ग्राम जयंती
गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ३० एप्रिलला सकाळी ६ वाजता प्रार्थना मंदिरात जगाला सर्व सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे युग संजीवनी ग्रामगीता ग्रंथाचे लेखक मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ११६ व्या ग्राम जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रार्थना मंदिरात विन्रम अभिवादन करून गावाच्या मुख्य मार्गाने रामधुन काढून ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गुरुदेव उपासक सहभागी झाले आहे.