पालम: मृत्यूशी झुंज अपयशी ; सर्पदंश झालेल्या सर्पमित्राचा मृत्यू पालम शेखराजूर येथील घटना
शेख राजूर येथील सर्पमित्र विकास भारत कदम वय 26 वर्ष हा तरुण एका घरात साप पकडण्यासाठी गेले असता त्यांच्या हाताला सापाने दंश केल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी घडली होती. विषारी सापाच्या दंशामुळे शरीरात वेगाने विष पसरल्याने त्यांना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. 15 दिवस डॉक्टरांनी त्यांना वाचविन्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा रविवार 31ऑगस्ट रोजी सर्पमित्र विकास कदम यांचा मृत्यू झाला. आज सोमवार 1 सप्टेंबर रोजी त्यांच्यावर राजूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.