वडवणी: मनोज जरांगे पाटील यांनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदाच्या कुटुंबीयांची कवडगाव येथे जाऊन भेट घेतली
Wadwani, Beed | Nov 1, 2025 मनोज जरांगे पाटील यांची संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेट — न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांना मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन त्यांना धीर दिला. या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांनी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण बीड जिल्हा तसेच राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.