भंडारा: भंडारा-बालाघाट महामार्गावरील खड्ड्यांविरोधात आमदार कार्यालयासमोरील खड्ड्यात हलगीनाद आंदोलन
भंडारा-तुमसर-बालाघाट या खड्डेमय राष्ट्रीय महामार्गामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे आमदार राजू कारेमोरे यांच्या कार्यालयासमोर परसवाडा (दे.) ग्रामपंचायत उपसरपंच पवन खवास यांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता दरम्यान हलगी वाजवून दवंडी देत आंदोलन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सत्ताधारी नेत्यांना महामार्गाच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या नागरिकांच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरवत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.