अकोला: पावसाच्या सरींमध्येही आर.डी.जी. मैदानात रंगीलो गरब्याचा जल्लोष
Akola, Akola | Sep 27, 2025 नवरात्रोत्सवाच्या पारंपरिक ठेक्यांवर थिरकणाऱ्या अकोल्यातील तरुणाईचे विशेष आकर्षण असलेल्या रंगीलो गरब्यात २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता निसर्गानेही आपली हजेरी लावली. रात्रीच्या सत्रात अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, पावसाचा आनंद घेत उपस्थित तरुणाईने गरब्याच्या तालावर आणखी जोमाने थिरकत जल्लोष साजरा केला. पावसाच्या सरींनंतरही मोठ्या संख्येने भाविक व नागरिकांनी मैदानात हजेरी लावली. गरब्याच्या नृत्याच्या लयीत संपूर्ण मैदान दुमदुमून गेले आणि वातावरणात उत्साह व आनंदाची लहर पस