जालना: जालना जिल्ह्यातील गाढेगव्हाण गावासह जिल्ह्यात खरीपिरणीच्या कामांना वेग
Jalna, Jalna | Jun 27, 2026 आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील गाढे गव्हाण गावासह जिल्हाभरात खरीप पेरणीच्या कामांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे, मागील काही दिवसापासून पाऊस लांबला होता त्यामुळे खरीप पेरण्या सुद्धा लांबल्या होत्या मात्र दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बळीराजा खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत असून यामध्ये मका, सोयाबीन तूर ,कपाशी या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.