नागपूर ग्रामीण: मदतीच्या बहाण्याने लूटमार करणाऱ्या टोळीला वाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अपघातात जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना वाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल कोठारी आणि त्यांचे मित्र जेवण करून परतत असताना त्यांच्या कारचा टायर फाटल्याने अपघात झाला. जखमी विशालला दुचाकीवर बसवून मदतीचे नाटक करत आरोपींनी निर्जन स्थळी नेले.