भोकरदन: नजीक पांगरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाला व पारायण सोहळ्याला माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लावली उपस्थिती
आज दिनांक पाच एप्रिल 2020 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता बदनापूर तालुक्यातील नजीक पांगरी येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी उपस्थिती लावली आहे,याप्रसंगी त्यांनी उपस्थिताशी संवाद साधत सांस्कृतिक उपक्रम ग्रामीण भागात सकारात्मकता,एकात्मता आणि भक्ती भाव दृढ करण्याचे कार्य करत आहे ही निश्चित समाधानाची बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.