जालना: जालना जिल्ह्यात ‘समता सप्ताह’ उत्साहात संपन्न; शाहीर अप्पासाहेब उगले यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप
Jalna, Jalna | Apr 14, 2026 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘समता सप्ताह’ जालना जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता शाहीर अप्पासाहेब उगले यांच्या सांस्कृतीक कार्यक्रामाने या समता सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांमुळे जिल्ह्यात समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा प्रभावी प्रचार झाला. या सप्ताहादरम्यान जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले.