जालना: शरद पवार हे भाजपाची बी टीम आहे -ओबीसी नेते नवनाथ वाघमारे रेल्वे स्टेशन हॉटेल मेरीट येथे शरद पवारांवर टोला
Jalna, Jalna | Jul 7, 2026 आज दि.7 जुलै 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या हॉटेल मेरिट येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते जयंत पाटील व भाजपा नेते विनोद तावडे यांची मुंबई येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये काय ठरले हे मात्र जरी निश्चित नसले तरी शरद पवारांच्या आदेशावरूनच जयंत पाटील बैठकीला गेले आहे,कारण शरद पवार हे भाजपाची बी टीम आहे,असा टोला त्यांनी लगावला.