17 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फारुख नगर येथे कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या जनावरांना जीवनदान दिले आहे. 9 गोवंश व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण एक लाख 80 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी फरार आरोपी शेख जाबीर ख्वाजा अलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे बाबूराव राउत वपोनी पांचपावली