आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाही; ते टिकवण्यासाठी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातआज दि 9 नोव्हेंबर ला 12 वाजता युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.