मुखेड: जांब येथील सरकारी दवाखान्यासमोर अवैध रित्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मुखेड पोलिसात गुन्हा नोंद
Mukhed, Nanded | Oct 12, 2025 दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री 12:05 च्या सुमारास जांब येथील सरकारी दवाखान्यासमोरील रोडवर आरोपी (1) अंकुश रेशमाजी कांबळे (2) रईस रऊफ कुरेशी (3) शायद शादुल शेख (4)वसीम यांनी संगणमत करून पिकअप वाहन क्र. MH-26-BE-8548 मध्ये 27 रेडे व 3 वगारी वाहतूक करीत असताना मिळून आले होते. ह्या प्रकरणी फिर्यादी पोकॉ मारुती मेकलेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुखेड पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पुढील तपास पोउपनि फड हे करत आहेत.