भंडारा: तुमसर बसस्थानक परिसरातून वृद्धाचा मोबाईल लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा जिल्ह्यातील विनोबानगर तुमसर येथील रहिवासी देबेलाल लक्ष्मण टेंभरे (वय ७० वर्षे) हे दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्थानक परिसरातील दुकानात साहित्य खरेदीसाठी गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील ५,१०० रुपये किमतीचा 'सॅमसंग गॅलेक्सी हा मोबाईल हातोहात लंपास केला. घरी परतल्यावर मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच टेंभरे यांनी सिटिजन पोर्टलवर तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत तुमसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.