भद्रावती: झुडूपी जंगलाचे पटटे अतिक्रमणधारकांना द्या.
भाजपचे नागपूर येथे ना.बावनकुळे यांना निवेदन.
शहरातील अनेक नागरीकांजवळ स्वतःची जमीन नसल्याने त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे शहरात मोकळ्या पडलेल्या गायरान व झुडूपी जंगलाच्या जागा महसूल विभागाकडे हस्तांतरीत करुन त्यांना पट्टे द्या अशी मागणी भाजपतर्फे शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांच्या नेतृत्वात नागपूर येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.