जालना: जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी!; ’मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार
Jalna, Jalna | Jun 18, 2026 जालना जिल्हा सामान्य रुग्णालय आणि नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरत असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश आले आहे. गुरुवार दि. 18 जून 2026 रोजी सायकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्तनांच्या कर्करोगाची अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या ऐतिहासिक टप्प्यामुळे जालना जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.