समुद्रपूर: तालुक्यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे १० घरांचे अंशतः नुकसान व शेकडो एकर शेती पाण्याखाली; पंचनामे सुरू
समुद्रपुर तालुक्यात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे १० घरांचे अक्षता नुसकान झाले आहे.तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात बाध फुटून व नदी नाल्या काठावरील शेतकऱ्यांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो एकरातील शेतपिक पाण्याखाली गेले.तर नदी नाल्याच्या काठावरील पिक खरडून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून झालेल्या नुसकानीचे पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार कपिल हाटकर यांनी संबंधित मंडल अधिकारी व तलाठ्याना दिले असून पंचनामे सुरू आहे.