समुद्रपूर: कोरा येथील लालनाला प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडले, ९.३८ घनमीटर प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू
समुद्रपुर तालुक्यातील महत्वाच्या प्रक्लपातिल एक असलेला कोरा येथिल लालनाला प्रकल्प हा गेल्या ४ दिवसापासून पासुन सुरु असलेल्या पावसाच्या पाण्याने भरत चालला सुरू प्रकल्प ६५.६८ टक्क्यांच्यावर भरल्याने खबरदारी म्हणून ९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास या प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेंटीमीटरने उघडले असुन ९.३८ घनमीटर प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तरी लाल नाला, पोथरा नदि, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.