समुद्रपूर: उगवण न झालेल्या सोयाबीन बियाण्याच्या विषयावर आमदार समिर कुणावार यांचा विधानसभेत आक्रमक पवित्रा
खरीपाच्या हंगामात सोयाबीन बियाण्याच्या उगवण झाली नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यासंबंधी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मध्ये ८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांनी आक्रमण पवित्रा घेऊन संबंध मंत्री महोदयांवर चांगले कडाळ असुन बियाणे कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.