कामठी: आजनी येथे डम्पिंग यार्डला कंटाळून ग्रामस्थांनी केला चक्काजाम
Kamptee, Nagpur | Sep 22, 2025 कामठी तालुक्यातील आजनी कामठी रोडवर कामठी नगर परिषदेने उभारलेल्या अवैध डम्पिंग यार्ड विरोधात आजनी, गादा, नेरी, भोवरी, रामनगर आदी ठिकाणचे ग्रामस्थ जवळपास दहा ते बारा वर्षांपासून लढा देत आहेत.मात्र, इतके वर्ष होऊनही यावर कुठलाच तोडगा काढला गेला नाही. उलट नगर परिषदेचे कर्मचारी अधिक जोमाने रस्त्यावर कचरा टाकू लागले. आज ग्राम पंचायत सदस्याने या रस्त्यावर आलेल्या कचऱ्याचे फोटो नगर परिषद मुख्यअधिकाऱ्यांना पाठविले असता पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देऊनही पुन्हा पत्र द्या म्हणून सांगण्यात आले.