भोकरदन: बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते रविकांत तूपकर यांचा उपोषणाला भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला पाठिंबा
आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील बळजळा साबळे व भोकरदन शहर या परिसरातून काही शेतकरी बांधव बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 जून 2026 पासून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी मालाला हमीभाव या मागणीसाठी उपोषण करत आहे,मात्र त्यांच्या या उपोषणाकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे शेतकरी नारायण लोखंडे विकास जाधव यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.