हिंगोली: बळसोंड येथे शासनाच्या मदतीचा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास प्रारंभ
हिंगोलत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोलत, बनसोंड तसेच परिसरातील इतर गावांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा होत असून नुकसानीच्या क्षेत्रानुसार हेक्टरी दराने भरपाई दिली जात आहे.