इगतपुरी: वांजोळे येथे शेतकरी कृती समितीची घोटी त्रंबकेश्वर महामार्गाच्या भूसंपादना विरोधात बैठक संपन्न
वांजोळे येथे शेतकरी कृती समितीची व शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आज बैठक संपन्न झाली या बैठकीत घोटी त्रंबकेश्वर महामार्गाच्या सापदरीकरणाला विरोध करण्यात आला असून यासंबंधी लवकरच कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे व इगतपुरी तहसील येथे एक गाव एक दिवस याप्रमाणे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आली