पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून 2 हजार बांबू लागवड करण्यात येणार आहे. उपायुक्त (उद्यान) नानासाहेब कामठे यांच्यामार्फत प्रतिकात्मक काही बांबू झाडांचे रोपण करून या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र बांबू धोरण २०२५, राष्ट्रीय बांबू मिशन तसेच महानगरपालिकेतर्फे विविध वृक्षांचे वृक्षारोपण अंतर्गत कळंबोली एन्ट्री पॉईंट ( शिवसेना शाखा) ते केएलई कॉलेज पर्यंत मुख्य रस्त्याच्या बाजूला २ हजार बांबूची लागवड करणे नियोजित आहे. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.