अकोला: अकोल्यातील अक्षय नागलकर हत्याकांडातील आरोपींची जुने शहरात अकोला पोलिसांनी काढली धिंड
Akola, Akola | Oct 30, 2025 अक्षय नागलकर हत्याकांडातील आरोपींची जुने शहरात धिंड अकोल्यातील बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची पोलिसांनी जुने शहर परिसरात धिंड काढली. 22 ऑक्टोबर रोजी जुने शहर भागात अक्षय नागलकर याची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर याच्यासह इतर आठ साथीदारांना पोलिसांनी घटनास्थळापर्यंत नेऊन “घटनास्थळ पंचनामा” असा उपक्रम राबवला. नागरिकांच्या मनातील भीती कमी करणे आणि कायद्याचा धाक निर्माण करणे हा या धिंडीचा उद्देश असल्याचे म्हटलं