गंगापूर: गंगापूर कायगाव रोडवर अपघात – एक जण जखमी, शासकीय रुग्णालयात केले दाखल
गंगापूर तालुक्यातील कायगाव रोडवर गॅस एजन्सीजवळ आज रविवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव यश आंबेकर (वय २४, रा. कन्नड) असे असून, अपघातानंतर परिसरात काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.