आमदार नाना पटोले यांनी 14 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात गोरेगाव (गोंदिया) येथील बैल बाजारातून खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या बैलांची डुग्गीपार पोलिसांच्या मार्गात अडवणूक करून कथित गोरक्षकांनी केलेली लूट उघड केली. वैध पावत्या असूनही शेतकऱ्यांचे बैल पळवण्यात आले. या गंभीर प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असता, त्यांनी पोलिसांना आदेश दिले. त्यानंतर तालुका दिवाणी न्यायालयाने बैल परत करण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात बैल जागेवर नव्हते.