भंडारा जिल्ह्यातील महसूल विभागाने अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर मोठी कारवाई केली असून, आंधळगाव पोलीस ठाण्यांतर्गत एका पिवळ्या रंगाचा टिप्पर (क्रमांक MH-40/CT-6000) व ९ ब्रास रेती असा एकूण ३५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास गोबरवाहीचे ग्राम महसूल अधिकारी हरिष मिश्रा हे गस्तीवर असताना, आरोपी टिप्पर चालक व मालक सुशीपाल हरिचंद वाघाडे (३५, रा. आलेसुर) हा कोणतीही शासकीय परवानगी न घेता ५४ हजार रुपये किमतीची